Gallery

Gallery

Jalsa - Oct 2022

Jalsa - Oct 2022

18 Oct 2022

Gokulashtami 2022

Gokulashtami 2022

18 Aug 2022

pramodlale

pramodlale

21 Apr 2024
more about GGS

April2024

April2024

28 Apr 2024
बंदिशीच्या गवाक्षातील रागसौंदर्य उलगडून दाखवणारा बहारदार कार्यक्रम गोपाळ गायन समाज येथे नुकताच सादर झाला 'आग्रा' या एकाच घराण्यातील तीन पिढ्यातील वाग्गेयकारांच्या बंदिशींचा समावेश कार्यक्रमात घेतला होता.आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी श्री.पतंजली मादुसकर यांची संकल्पना संकल्पना,असणाऱ्या कार्यक्रमात आग्रा घराण्यातील या बंदिशी कशा वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे उत्तम विशद केले. उ.खादिम हुसेन खाॅं पं.बबनराव हळदणकर पं.अरुण कशाळकर यांच्या अ.बिलावल, शिवरंजनी,बागेश्री, रागेश्री,झिंजोटी,भैरवी इ.रागातील बंदिशींचे गायन डॉ.राजश्री महाजनी, आसावरी असेरकर यांनी केले.नोमतोम आलापी,सुबक आलापी,लयकारी,सरगम व चुस्त तानांसह सुरेल मांडणीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाला अत्यंत पोषक हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्त्रबुद्धे,आणि सचिन भोसले यांनी तबला साथ केली.सुप्रसिद्ध गायक आणि गोपाळ गायन समाजाचे प्रमुख विश्वस्त डॉ.विकास कशाळकर हे प्रमुख उपस्थित होते.त्यानी या कार्यक्रमाचे कौतुक करत विविध घराण्यात बंदिशींचे सादरीकरण कसे होते हेही सादर व्हावे असे मत व्यक्त केले.गोपाळ गायन समाजच्या कार्याविषयी श्री कशाळकर यांनी माहिती दिली.विश्वास शिरगावकर यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार झाले.यावेळी मान्यवर कलाकार व समाजातील विद्यार्थी उपस्थित होते


Gallery RSS RSS Feed | Archive View | Powered by Zenphoto